Verse 1चला चला हो जाउया
चला चला हो जाउया
जगउध्दारक पाहूया!
Verse 2परमोच्चावर गौरव, षांती या धरणीवरती
कृपा नरावर, परमोत्साहें देवदूत गाती हा ....
प्रतिध्वनीने ग्रह हे सारे व्योंमी दणदणती
चला, गीत ते आपणही गाउ
Verse 3भविष्यवादी, स्वर्गी सारे लागति नाचाया
साधे भोळे मेंढपाळही लागति धावाया
पुर्वकडूनी साधु निघाले प्रभुला भेटाया
चला दर्शना आपणही जाउ
Verse 4प्रीती आली देह
धरोनी आम्हां ताराया,
हस्त धरोनी मृतांस आम्हा
पुनरपि उठवाया,
जय जय येशू या
मधुघोषे भुवना व्यापाया,
प्रभुला हदयी
साठवुनी घेवू