Kristh Majha To Sarvancha
Song: Kristh Majha To Sarvancha
Verse 1ख्रिस्त माझा तो सर्वांचा
या नमा त्याला
तोच आपुला तारणारा
या स्तवा त्याला
ख्रिस्त माझा तो सर्वांचा...
Verse 2तो जगाचा त्राता पालक
मालक या विश्वाचा... (2)
क्रूसावरती अर्पूनी प्राणा
उठला तारायला
ख्रिस्त माझा तो सर्वांचा...
Verse 3तो राजांचा राजा येशू
अधिपती या भूवनीचा
अद्भूत मंत्री, देव समर्थ
पिता सनातन आमुचा
ख्रिस्त माझा तो सर्वांचा...
Verse 4ख्रिस्त दाता, शांती प्रीतीचा
अविरत आनंदाचा
एकच वैध्य जगती हाची
दैवी आरोग्याचा
ख्रिस्त माझा तो सर्वांचा...
Verse 5त्याचे व्हावे मनी जयांच्या
स्वीकाराहो त्याला
जगदुद्धारक, जीवन
सत्य आळवा नित्य त्याला
ख्रिस्त माझा तो सर्वांचा...